Posts

Showing posts from August, 2020

शिवश्री

शिवश्री ऑगस्ट ०१, २०१६ शिवश्री शब्दाचा वापर सर्वप्रथम सातवाहन राजांच्या काळात वापरला गेल्याचे आढळते आजच्या  वर्तमान काळात अनेक लोकांच्या नावापुढे शिवश्री हे नाव लिहले जाते लोकांचे म्हणणे आहे कि ते शिवरायांच्या नाव आहे म्हणून आम्ही लावतो मात्र सत्य वेगळे आहे शिवरायांच्या नावाचा जयजयकार करणे वेगळे आणि शिवरायांच्या विचाराणा आचरणात आणणे वेगळे  आता मूळ विषयाकडे   येऊ या शिवश्री शब्द हा ऐतिहासिक पुरावे देऊन सिद्ध झालेला आहे तर या विषयी शिवश्री हा शब्द नेमका का आणि कशासाठी वापरला जातो याचे नेमके काय अर्थ आहेत  प्रथम आपण पाहिले तर शिव + श्री असा याचा फोड करून मांडता येईल आता शिव म्हणजे शंकर सुद्धा होऊ शकतो व शिव म्हणजे सातवाहनांचा  वंशज देखील सिमुक होऊ शकतो साधारण पाहिल्यास  सातवाहन राजे हे बौद्ध धम्माच्या प्रभावाखाली होते हे नाकारता येत नाही कारण तसा त्यांचा पुराव्यानिशी सिद्ध होणारा इतिहास आहे  म्हणून पहिला शिव हा मान्यता प्राप्त होऊ शकत नाही  दुसरा राजा सिमुक याला आद्य मानले जाते सातवाहनांच्या राजांमध्ये त्यामुळे त्याच्या नावाचा वापर  केला जा...

धम्मचक्र अनुवर्तन नव्हे धम्म चक्र प्रवर्तनच

धम्मचक्र अनुवर्तन नव्हे धम्म चक्र प्रवर्तनच ऑक्टोबर ०६, २०१६ १४ ऑक्टोबर १९५६ भारताच्याच नव्हे जगाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्रांती जी  जगातील सर्वच क्रांती मोडून काढीत नवा इतिहास घडवला गेला बाबासाहेबांच्या या क्रांतीचे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी  कोरला गेला हा इतिहास  रक्ताचा एक हि थेंब न सांडता केलेली धम्म क्रांती जगाच्या इतिहासात पहिलीच होती . धम्म स्वीकारला तेव्हा तारीख १४ ऑक्टोबर ची होती या दिवशी स्वीकारलेला धम्म भारताच्या इतिहासात बुद्ध धम्माल नवजीवन देणारे ठरले या भारतात बौद्ध लोक  असले तरी धम्म मात्र नामशेष होता हे मानावेच लागते महाबोधी विहार बुद्धाचे असून देखील बुद्धाचा धम्म नव्हता बुद्धाला या भारतात जिवंत  करून केलेली क्रांती हि बुद्धाच्या धम्म क्रांतीचेच रूप आहे  सारनाथ इथे बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केले तर बाबासाहेब यांनी नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन केले  माझे हे म्हणणे थोडे धाडसाचे आहे कारण एकीकडे बुद्धाने हि धम्मचक्र प्रवर्तन केले आणि बाबासाहेब यांनी हि धम्म चक्र प्रवर्तन केले तर ते कसे काय केले  अनेक विद्वानांचे मत असते कि धम्मचक्...

आणि बुद्धच महार झाले ...

आणि बुद्धच महार झाले ..................... ऑक्टोबर २४, २०१६ जोहार मायबाप जोहार अशी हाक कानी आली कि दारासमोर म्हणे एक माणूस असायचा हातात नागफण्याची काठी घेऊन उभा असलेला राकट बांध्याचा माणूस गावाची महारकी करण्याचे काम करायचा गावाची मेलेली ढोर हा गडी एकटाच एका हाताने उचलून न्यायचा भले भले थकायचे पण हा एकटा ओढत नेत होता पण जगणे याचे जनावराला हि लाजवील असे होते हो गावकुसाबाहेर जीवन जगायचा व गावगाडा हाकीत बसायचा एका महसूर्याच्या जन्माने यांच्या जीवनाचे सोन झाले गावकुसातून गावात आला बंगला आला गाडी आली पण जात काय सुटली नाही भीमाने महाराची महारकी सोडली बुद्धाच्या ओटीत टाकून आज महार म्हणून स्वतः मिरवतात अश्या लोकांनी खास करून इकडे लक्ष द्या का दिला बुद्ध बाबासाहेबानी बुद्धच का दिला येशू हि देऊ शकले असते कि पैगंबर हि देऊ शकले असते गुरु साहेब पण देऊ शकले असते महावीर पण देऊ शकले असते पण तुम्हाला बुद्धच का दिला याकडे आम्ही कधी वळलो आहे का तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या सन्मानासाठी तुमच्या स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी जातीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी रूढी बंधने...

जिथे बुद्ध हसतो तिथेच समाज वसतो

जिथे बुद्ध हसतो तिथेच समाज वसतो डिसेंबर १६, २०१६    पहाटेचा सूर्य माथ्यावर आला  होता.  अंगातून घामाच्या धारा  वाहू लागल्या होत्या क्षणभर विश्रांतीची गरज भासत असताना कंठ तहानेने व्याकुळ झाला होता. अश्यावेळी कुठे तरी निवारा शोधण्याची डोळ्यांची तळमळ चालू होती . क्षणात असे काही वाटू लागले कि आता जीवनाची यात्रा इथेच संपते कि काय ?  आणि अचानक डोळ्यासमोर  मंद झुळझुळ वाहणारा झरा नजरेस पडतो. आणि जीवाला हायसे वाटते . थंड गार पाण्याचे चार घोट घश्याखाली जाताच पोटामध्ये शांत  वाटू लागते. थंडगार पाणी तोंडावर शिडकुन आलेला क्षीण दूर करण्यास प्रयत्न करतो. पुन्हा ताजेतवाने होऊन क्षणभर विश्रांती करण्याचा बेत करतो.  निसर्गाच्या या कुशीत शांत दगडावर झाडाच्या सावलीखाली निपचित पडल्यागत झोप लागते.   आणि जीवनातील सर्वोच्च सुखाला गवसणी घातल्याचे सुख मिळते.   पुन्हा सायंकाळचा सूर्य अस्ताला निघालेला जाणवतो . आणि मग पावले नकळत गावाकडे वळू लागतात. थोडा थोडा अंधार पडू लागतो गावात येऊन थबकलेली पाऊले आता रात्रीचा निवारा शोधू लागतात. मंदिर मस्जिद विहारे सारी का...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : १

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : १ जानेवारी १५, २०१७ आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : 1 सम्यक दृष्टी : म्हणजे मध्यम दृष्टिकोनातून विचार करणे मध्यम मार्गीय ज्ञानाला अथवा विचार करण्याच्या पद्धतीला सम्यक दृष्टी म्हणतात . यात कुशल अकुशल म्हणजे भल्या वाईट गोष्टीचे ज्ञान अपेक्षित आहे. हिंसा,चिरो,व्यभिचार किंवा मिथ्याचाराचा समावेश अकुशल कायिक कर्मात होतो.असत्य,चुगली,कटू वा कठोर वचन आणि व्यर्थ बडबड हे वाचिक अकुशल काम होत. अविद्या,लोभ, व्यापाद, प्रतिहिंसा आणि मिथ्यादृष्टी धारणा हि मानसिक अकुशल कर्मे होत. ह्या अकुशल कर्मांच्या विरुद्ध कृतीला कुशल हि संज्ञा होय. सम्यक दृष्टीचा मराठी संतावर झालेला परिणाम : कुशल याला संतांनी योग्य वा शुभ आणि अकुशल याला अयोग्य वा अशुभ अश्या संज्ञा वापरल्या आहेत आणि यांच्या आचारांच्या मूळ कारणांना विचारपूर्वक ओळखणे हाच अर्थ सम्यक दृष्टीत अभिप्रेत आहे . हि सम्यक दृष्टी केवळ कायिक आचारापुरातीच सीमित नसून तिचा व्याप मानसिक आणि वाचिक आचारणापर्यंत पसरला आहे . बुद्धाच्या मूलगामी विचारांची गरुडझेप जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित असून काय...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : २

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : २ जानेवारी १५, २०१७ सम्यक संकल्प : योग्य निर्णय किंवा निश्चय म्हणजे सम्यक संकल्प होय. साधकाला साधनेसाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता असते. सदाचाराचा साधनेला उपयोगी ठरणाऱ्या निर्णयाचा संकल्प करणे जरूर ठरते . अद्रोह, अहिंसा,निष्कामता आणि तृष्णा वा वासनानाश तथा त्यागाचा दृढ  संकल्प यात अभिप्रेत असतो. अविद्याश्रीत संस्कारांना निर्मळ करण्यास ज्ञानमय संकल्प करणे म्हणजेच  सम्यक संकल्प होय.  मराठी संतांवर सम्यक संकल्पाचा प्रभाव जाणवतो.  खास करून तुकाराम महाराज बुद्धाच्या जास्तच जवळ गेलेले वाटत आहेत.  कारण त्यांच्याच साहित्यात बुद्ध तत्वांचा वापर जास्त आहे बुद्ध शिकवणीला आपलेसे केलेलं पाहायला मिळते. तुकाराम महाराज म्हणतात , स्वतः आपल्या हातानी संसाराला आग लावून बाहेर पडल्यावर मागे वळून पाहू नये . जसा दिपावर जळणारा पतंग मागे -पुढे पाहत नाही .  सवंसारा आगी लावुलेनी हाते । लावूनी मागे पहात नाही ।।  तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दिपावरी ।। ३४१४ संकल्पपूर्वक सर्व लौकिकाची लाज बाळगून अन्नवस्त्राची लालसा लागल्...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग :३

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग :३ जानेवारी १६, २०१७  सम्यक वाणी : बुद्धाच्या अष्टांग मार्गातील हा तिसरा मार्ग आहे . ह्यात योग्य आणि सत्याधिष्टित धर्मानुकूल वचनांचे उच्चारण आणि असत्य व धर्मबाह्य वचनांचा त्याग अभिप्रेत आहे . यामध्ये कुणालाही विनाकारण दुखावणाऱ्या कठोर वचनांचा व चुगलखोरांचा यात निषेध केला असून उच्चारलेल्या विवेकपूर्ण सत्यवचनांचे प्रत्यक्षात आचरण अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. यामध्ये शब्दामध्ये गोडवा असावा सत्याची धार असावी असे बुद्धाचे सांगणे आहे वाणीत समोरच्या व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी.  अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सम्यक वाणी म्हणजे चांगले शब्द उच्चारावे सत्य बोलावे विनाकारण कुणास हि वाईट बोलू नये.  तर अश्या प्रकारे सम्यक वाणी बाबत आपण पाहिले  पण आता याचा संतांवर प्रभाव कसा पडलाय ते हि पाहू या . तुकाराम महाराज म्हणतात , राग लोभाची पर्वा न करता सत्य सांगावे तुका म्हणे सत्य सांगे । येवोत रागे येतील ते ।। एवढेच काय परोपकार प्रसंगी हि असत्य बोलू नये  असा त्यांचा कटाक्ष आहे असत्य वाचन होता सर्व मोडी ...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४ जानेवारी १७, २०१७ सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत  तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे . हिंसा त्याग , दंड व शस्त्रप्रयोग  त्याग , प्राण्यांवरील दया , हेच सम्यक कर्म आहे . मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत . त्यासाठी अहिंसा,अचौर्य,सत्य  मद्यत्याग  करावे . हि अपेक्षा असते . भिक्षु ना अकाल भोजन,सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे . त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते . या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो . सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते .   बुद्धाच्या सम्यक कर्माचा प्रभाव मराठी संतांवर पडलेला प्रभाव पाहताना आपण ज्ञानदेव  म्हणतात . हे विश्वाची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाला ।। १२-२११ पुढे जाऊन संत तुकाराम...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : 5

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : 5 जानेवारी १९, २०१७ सम्यक अजिविका : यामध्ये योग्य आणि नीतीच्या मार्गाने अर्थोपार्जन करणे अपेक्षित आहे . संसारी माणसाला उदारनिर्वाहाकरिता जो व्यापार, व्यवसाय करावा लागतो तो नितीधर्मावर आधारित असावा . तो करताना इतरांची हानी करून स्वतःचा स्वार्थ साधने बुद्धाला अमान्य आहे. बुद्धाने खालील व्यवसायांना निषिद्ध ठरवले आहे. 1} शस्त्रांचा व्यापार 2}प्राण्यांचा व्यापार 3} मदयादींचा व्यापार4} मांसविक्री5} विषाचा व्यापार याखेरीज लक्खन सुत्तात दांडी मारणे, माप कमी करणे, लाच देणे, फसवणूक करणे, कपट करणे , मानसिक त्रास देणे, वध करणे , डाका टाकणे, लूटमार करणे हे अयोग्य आहेत बुद्धाने चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नये असाच संदेश दिला आहे तुमचे जीवन हे चांगले आचरण असणारे असावे सम्यक आजीविका चा मराठी संतांवर असणारा प्रभाव पाहू या वैयक्तिक व सामाजिक जीवनाच्या शुद्धीसाठी ह्याची गरज आहे . मिथ्या आजीविकेचा त्याग करून सम्यक मार्गाने उदरनिर्वाह करणे म्हणजे सम्यक आजीविका होय. यात धर्मानुसार प्रामाणिकपणे श्रम करून धनार्जन करणे अभिप्रेत आहे. केवळ घाम गाळून द्रव्योपार्...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ६

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ६ जानेवारी १९, २०१७ सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे बाह्य शरीराचा व्यायाम नाही . कसरत करून कमावलेली शरीयष्टी म्हणजे सम्यक व्यायाम नाही. सम्यक व्यायाम म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्न  अथवा अभ्यास करणे.  निर्वाण व सत्यप्राप्तीच्या कार्यात अथवा अभ्यास अत्यावधक मानून बुद्धाने उद्योग किंवा प्रयत्नपूर्वक अभ्यासाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. मनात नको ते वाईट विचार येऊ न देणे आणि मनातील चांगले विचार बाहेर जाऊ न देणे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाला काहीही अश्यक्य किंवा अलभ्य नाही .  ह्या गोष्टीचा संतांनी आपल्या उपदेशात व आपल्या साहित्यात उल्लेख केला पण तो मात्र भक्तीच्या मार्गासाठी वापरला पाहू या संतांचा याबाबत काय अर्थ आहे तो संत एक सारखे ईश्वराचा धावा करतात आणि आपल्या मनात ईश्वराशिवाय दुसरे विचार येऊ नयेत  ह्यासाठी करुणा भक्तात . ह्यासाठी  त्यांनी प्रयत्न किंवा अभ्यासाची महिती गायली आहे . आणि ह्याला बौद्ध धम्मात सम्यक प्रधान असे नाव आहे. न मिळो खाया न वाढो संतान । परी हा नारायण कृपा कर...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ७

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ७ जानेवारी २७, २०१७ सम्यक स्मृती { Right Mindfulness }: अखंड जागरूकता म्हणजे सम्यक स्मृती होय. कोणतीही क्रिया करताना किंवा अनुभवताना आपण ती विशिष्ट क्रिया करीत आहोत वा वेदना अनुभवत आहोत याची क्षणोक्षणी जाणीव ठेवणे हा अर्थ सम्यक स्मृतीत अभिप्रेत आहे . कायानुपश्यना, वेदनापश्यना व धर्मानुपश्यना यांचे संकल्पित रूप म्हणजे सम्यक स्मृती होय. या चार हि विचारांची जाणीव स्मृतीद्वारे ठेवावी लागते. व अखंड जागरूक राहावे लागते. ह्यांची भावना आचरण करणे म्हणजेच आत्मशरण आणि अनन्यशरण होऊन वागणे होय. भारतीय अध्यात्म साधनेत स्मृतीचे अनन्य साधारण महत्व हे बौद्ध धम्मात च आहे . मराठी संतांना सम्यक स्मृती, स्मरण ह्यांचा वारसा त्यातूनच लाभला आहे . बौद्ध धम्मात ज्यांना पंचेंद्रिये म्हणून ओळखल्या जाते , त्या श्रद्धा , वीर्य,स्मृती ,समाधी,आणि प्रज्ञा. यांचा अभ्यास योगसूत्रातून अत्यावश्यक समजला जातो. थोडक्यात सम्यक स्मृती म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. आता स्मृती म्हणजे माणसाची स्मरणशक्ती असा सरळ अर्थ येतो पण वरती तुम्हाला काही वेगळेच वाचायला मिळाले असेल मग , इथे द...

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ८

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ८ जानेवारी २७, २०१७ सम्यक समाधी :  ह्या मध्ये माणसाच्या मनातील विकार शांत होऊन मन एककेंद्रित होणे आवश्यक  असते. कायिक क्लेशांना न जुमानता साधकाने मन एकाग्र केले पाहिजे. त्यामुळे कायम चित्तशुद्धी होते व चित्तकायशुद्धीतून प्रज्ञा प्रकाशमान होते.  अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मानवाचा स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हे होय. मानवाने मनावर नियंत्रण ठेवल्यास त्याच्या वागण्या बोलण्यावर व त्याच्या कृतीमध्ये खूप बदल  जाणवतो यालाच त्याची प्रज्ञा जागृत होणे म्हणतात हा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग आहे कारण ज्याच्या अंगी प्रज्ञा जागृत झाली असेल तोच व्यक्ती शील करुणा अंगी धारण करून निर्वाणाकडे झुकलेला असतो म्हणून हा मार्ग  बुद्धाच्या शिकवणीत शेवटचा आहे. प्रथम हे लक्षात घ्यावे कि समाधी मार्ग बुद्धाने शेवटचा मार्ग सांगण्यामागे सुद्धा कारण आहे इतर लोकांनी समाधी  प्रथम सांगितली आहे ध्यान प्रथम सांगितले आहे पण बुद्ध मात्र ते शेवटचा मार्ग सांगतात.  आता याचा संतांवर किती प्रभाव आहे तो पाहू या. बहुतांश संतांचा एकांतात बसू...

चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व

Image
चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व एप्रिल ०४, २०१७ सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे त्याशिवाय कामरूप, बंगाल , आसाम, ओरिसा पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भाग अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते  .  जगातील लोकांना भारतीय इतिहासाची खरी ओळख करून देणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला अग्रगण्य स्थान दिले जाते आणि दिलेच पाहिजे . त्याने आपल्या राज्यात बौद्ध धम्माला राजधर्माची मान्यता दिली व मैत्रीचा संदेश घेऊन जगभरात धम्मदूत पाठवले .   तसेच भारताच्या  कानाकोपऱ्यात अशोकाच्या आदेशाचे माहितीचे शिलालेख अभिलेख लघुलेख गुहालेख स्तंभ लेख कोरून ठेवले आहेत  आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासाची खरी ओळख आपणास मिळते हे श्र...

बळीराजा : एक काल्पनिक पात्र

बळीराजा : एक काल्पनिक पात्र ऑक्टोबर १९, २०१७ बळीराजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळीराजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्याबाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळींबाबत  संदर्भ सापडतात ते फक्त आणि फक्त पुराणकथेत च बाकी कोणतेही पुरावे नाहीत बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो . या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही  बळीराजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन   हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळीराजा हा शेतकरी राजा आहे पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळीबाबत पुरावे नाहीत. याचा अ...