Posts

माऊली संत ज्ञानेश्वर

Image
!!राम कृष्ण हरी!! संत २ माऊली संत ज्ञानेश्वर 'जो जे वांछिल, तो ते लाहो' असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्तजण प्रेमाने 'माउली' म्हणतात. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होते. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे थोरले बंधू. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले.सर्व भगवतगीता सर्वसामान्य माणसांना समजावे ह्या हेतूने भावार्थदीपिका ह्या नावाने भगवत गीतेवर निरूपण भाषांतर करून विश्वबंधुत्त्वाची प्रेरणा देणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ केला.ह्या ग्रंथामुळे केवळ भारतातच नाहीतर जगात भारतीय संस्कृती आणि संतवाड:मयाकडे लक्ष वेधले गेले. संत ज्ञानेश्वर...

संत एकनाथ

Image
!!राम कृष्ण हरी!! संत ३ संत एकनाथ संत एकनाथांचा जन्म १५३३ साली पैठण येथे झाला. संत एकनाथ यांचे पंजोबा पंढरपूर येथील विठ्ठल पंथातील प्रमुख व्यक्ती श्री भानुदास होते होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे सूर्यनारायण होते.बालपणीच आई-वडील वारल्यामुळे एकनाथ पोरके झाले. आजोबांच्या छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले. संत एकनाथ महाराज हे लोकांना जागृत करण्यासाठी त्यावेळी असणाऱ्या समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिक स्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.त्यांच्या साहित्यातून,भारुडातून त्यांनी रंजन व समाज प्रबोधन केले. ‘विंचू चावला’, दादला’ हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत आशय लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. आपले भाग्य आहे की एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली. सर्वसामान्य लोकांना समजेल असे एकनाथांची भारुडे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 125 विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या 300 आहे. तसेच एकन...

संत नामदेव

Image
संत ४ संत नामदेव संत शिरोमणी नामदेव महाराज ह्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० ला झाला. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता. नामदेवांच्या घरात त्यांच्या आजोबापासून विठ्ठलभक्तीचे वातावरण होते त्यामुळे त्यांना बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. महाराष्ट्रातील मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी ते वारकरी संतकवी होते. भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते.त्यांनी उत्तर भारतात तब्बल ५४ वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. नामदेवांनी पंजाबमध्ये भक्तिमार्गाचा शुभारंभ केला. शिखांच्या गुरू ग्रंथ साहिबातले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. रामानंद, कबीर व नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली. गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे भावनिक एकात्मता प्रबोधन केले. राजस्थानातील जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवर अशा मोठ्या शहरातून नामदेवांची मंदिरं आहेत. तसेच त्यांच्या नावाच्या शाळाही आहेत. संत नामदेवांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रच...

संत गाडगे बाबा

Image
!!राम कृष्ण हरी!! संत ५ संत गाडगे बाबा || गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला || विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगे महाराज हे "गाडगे बाबा" म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्व:च्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देव...

संत तुकडोजी महाराज

Image
!!राम कृष्ण हरी!! संत ६ संत तुकडोजी महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका,अस्पृश्यता गाडून टाका,दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. विशेष म्हणजे चीन युद्ध १९६२ व पाकिस...

संत गोरा कुंभार

Image
!!राम कृष्ण हरी!! संत ८ संत गोरा कुंभार (कालवुनी माती तुडवीत गोरा) संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते.तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन मानले जातात व संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते. गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते.गोरोबांना लिहायला वाचायला येत होते. स्वार्थी आणि लोभी मनुष्य वारकरी संत असल्याचे त्यांना मान्य नाही संत गोरा कुंभार हे आध्यत्मिकदृष्ट्या संतपदाला पोहोचलेले होते, पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते अनन्यसाधारण भक्त होते. गोराबा हे संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यांना सर्व जण गोरोबाकाका म्हणत असत. त्यांचे गाव मराठवाड्यातील धाराशिव-उस्मानाबादजवळील तेर-ढोकी (या गावास सत्यपुरी किंवा तेरणा असेही म्हणतात) हे होय. गोरोबाकाका प्रापंचिक असूनही विरक्तच राहिले. तेरेढोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता.कुंभारकाम करत असताना देखील ते पांडुरंगाच्या भजनात सदैवतल्लीन असे. पांड...

संत रामदास

Image
!!राम कृष्ण हरी!! संत ९ : संत रामदास समर्थ रामदास, नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. संत रामदासांच्या एका अभंगावरून असे दिसते, की प्रत्यक्ष रामचंद्रांनीच स्वप्नात येऊन ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र त्यांना दिला. राममंत्राचा तेरा कोटी जप,वेदशास्त्रे, वेदान्त, काव्ये, पुराणे ह्यांचा अभ्यास; गायत्री-पुरश्चरणे; संगीतसाधना त्यांनी नाशिक जवळील टाकळी ह्या गावी असलेली एक गुहेत केली. त्यानंतर ते भारतभ्रमणास निघाले. काशी, प्रयाग, गया,अयोध्या, श्रीनगर; हिमालयातील बद्रिनारायण आणि केदारनाथ अशी अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. अयोध्येत त्यांचे वास्तव्य सर्वाधिक म्हणजे अकरा महिने होते. पंजाबात जाऊन तेथील शीख धर्मगुरूंना ते भेटले. मानसरोवराची प्रदक्षिणा केली. पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घेतले. राजकारण धर...