संत एकनाथ
!!राम कृष्ण हरी!!
संत ३
संत एकनाथ
संत एकनाथांचा जन्म १५३३ साली पैठण येथे झाला. संत एकनाथ यांचे पंजोबा पंढरपूर येथील विठ्ठल पंथातील प्रमुख व्यक्ती श्री भानुदास होते होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे सूर्यनारायण होते.बालपणीच आई-वडील वारल्यामुळे एकनाथ पोरके झाले. आजोबांच्या छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले.
संत एकनाथ महाराज हे लोकांना जागृत करण्यासाठी त्यावेळी असणाऱ्या समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिक स्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.त्यांच्या साहित्यातून,भारुडातून त्यांनी रंजन व समाज प्रबोधन केले. ‘विंचू चावला’, दादला’ हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत आशय लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. आपले भाग्य आहे की एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली.
सर्वसामान्य लोकांना समजेल असे एकनाथांची भारुडे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 125 विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या 300 आहे. तसेच एकनाथांच्या काही गौळणीही प्रसिद्ध आहेत.
#संतांचीचित्रवारी
#माझीआठवणीतीलवारी
#facebookdindi #KalaKariWarkari #aadharwari #SantEknath

Comments
Post a Comment