भागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव



भागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव

 | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Jul 2020, 10:52:00 AM

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी भारतभ्रमण केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

Sant Namdev
    
👉मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक, 
👉व्रज भाषांमध्येही काव्ये रचणारे, 
👉शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातहिले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि 
👉कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे 
👉संत नामदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा.


👉संत ज्ञानेश्वर माऊलींना समकालीन असणाऱ्या संत 
👉नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. 

👉अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. 👉पांडुरंगच त्यांचे सर्वकाही होता.
👉 विठ्ठलाशी ते संवाद साधत. 
👉या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

👉 भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी, 
👉संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. 
👉प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. 

'हे' सात गुरु-शिष्य कायम स्मरणात राहतील; वाचा

♨️नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते

👉वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज
👉  नामवेदाचेनामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. 

👉आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती.

👉 संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते.
👉 संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. 👉भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

जमला संतमेळा, अवघा रंग एक झाला

♨️संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे 
👉निवृत्तीनाथ, 
👉ज्ञानेश्वर माऊली, 
👉सोपानदेव, 
👉मुक्ताबाई, 
👉नामदेव, 
👉चोखामेळा, 
👉विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. 

♨️यानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

👉 तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली होती.

♨️ त्यातून नामदेवांना आपल्या कामासाठी तत्त्वज्ञानाचे अधिष्ठानच मिळाले होते

👉कुशल संघटक असणाऱ्या निवृत्तीनाथांना आणि नामदेवांना एकत्र यावेसे वाटणे स्वाभाविक होते.
👉 त्यासाठी वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असून, नामदेव स्वत: आळंदीला गेले.
👉 संत संमेलनांमधील चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली.
👉 त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण-निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. 

सामान्यापासून असमान्यापर्यंतचा प्रवास म्हणजे नरेंद्र ते विवेकानंद

♨️ज्ञानदेव-नामदेव भेट

👉नामदेव, ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला होता. 
👉ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. 
👉त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. 
👉त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. 
👉महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबपर्यत हे संत गेले.
👉 माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. 
👉नामदेव कीर्तन करत. 
♨️चोखामेळा टाळकरी बनून त्यांना साथ देत. 
♨️जनाबाई कीर्तनाचे संचलन करत. 
♨️गोरा कुंभार, 
♨️सावता माळी, 
♨️परिसा भागवत, 
♨️चोखा महार आणि त्यांचा परिवार, 
♨️जगन्मित्र नागा, 
♨️नरहरी सोनार, 
♨️दासी जनी 

सगळेच त्यात होते. 
♨️पंजाबातून जाल्हण सुतारही पंढरपुरापर्यंत सोबत आले.
 हे 
♨️संत म्हणजे, टाळकुटे विरक्त नव्हते, तर
♨️ त्या-त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते.

मेघदूत, शाकुंतलकार, संस्कृतमधील अभिजात लेखक महाकवी कालिदास

♨️नामदेवांची साहित्यरचना

संत नामदेवाची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना केली. 
👉त्यातील सुमारे बासष्ट अभंग नामदेवजीकी मुखबानी नावाने शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. 
👉संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
👉 संत नामदेवांनी हिंदी साहित्याला नवे भान दिले. 
👉त्यांच्या कामातूनच पुढे
♨️ रामानंद, 
♨️कबीर,
♨️ नानक, 
♨️दादू दयाळ, 
♨️मीरा, 
♨️नरसी मेहता, 
♨️मलूकदास 

अशी संतांची मांदियाळी देशभर उभी राहिली. पंजाबात तर ते दोन दशकांहून अधिक काळ राहिले. नामदेवांचा देशभरावरील प्रभाव आजही पाहता येतो. 

♨️महाराष्ट्र आणि 
♨️पंजाबाबरोबरच 
♨️राजस्थान, 
♨️गुजरात, 
♨️मध्य प्रदेश, 
♨️उत्तर प्रदेश, 
♨️हरियाणा, 
♨️उत्तरांचल,
♨️ हिमाचल प्रदेश 

या राज्यांत त्यांची मंदिरे आहेत. 

♨️वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. 
♨️त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे, तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे. 

Comments

Popular posts from this blog

शिवश्री

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे