संत गाडगे बाबा
!!राम कृष्ण हरी!!
संत ५
संत गाडगे बाबा
|| गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ||
विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगे महाराज हे "गाडगे बाबा" म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्व:च्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता.
घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्यांना शिकविला. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वछता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत.

Comments
Post a Comment