संत गोरा कुंभार

!!राम कृष्ण हरी!!

संत ८
संत गोरा कुंभार (कालवुनी माती तुडवीत गोरा)

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते.तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन मानले जातात व संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. संत गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते. गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवद्भक्तीचे संस्कार झाले होते.गोरोबांना लिहायला वाचायला येत होते. स्वार्थी आणि लोभी मनुष्य वारकरी संत असल्याचे त्यांना मान्य नाही

संत गोरा कुंभार हे आध्यत्मिकदृष्ट्या संतपदाला पोहोचलेले होते, पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते अनन्यसाधारण भक्त होते. गोराबा हे संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यांना सर्व जण गोरोबाकाका म्हणत असत. त्यांचे गाव मराठवाड्यातील धाराशिव-उस्मानाबादजवळील तेर-ढोकी (या गावास सत्यपुरी किंवा तेरणा असेही म्हणतात) हे होय. गोरोबाकाका प्रापंचिक असूनही विरक्तच राहिले. तेरेढोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता.कुंभारकाम करत असताना देखील ते पांडुरंगाच्या भजनात सदैवतल्लीन असे.
पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमीमग्न असे.. एक आख्यायिका अशी आहे की विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेल्या गोरा कुंभार यांना माती तुडवितांना मूल पायाखाली रडत असल्याचे देखील लक्षात आले नाही. माती रक्ताने लाल झालेली आणि त्यांच्या बायकोला दिसली आणि तिने हंबरडा फोडला..आकांत केला…तिच्यावर आणि गोरा कुंभार यांच्यावर आभाळ कोसळले. प्रायश्चित म्हणून गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले.

#संतांचीचित्रवारी
#माझीआठवणीतीलवारी
#facebookdindi Sketch by @Ajay Vilas Shinde

May be a cartoon

Comments

Popular posts from this blog

शिवश्री

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

भागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव