माऊली संत ज्ञानेश्वर

!!राम कृष्ण हरी!!

संत २
माऊली संत ज्ञानेश्वर

'जो जे वांछिल, तो ते लाहो' असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्तजण प्रेमाने 'माउली' म्हणतात.
संत ज्ञानेश्वर यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होते. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे थोरले बंधू. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले.सर्व भगवतगीता सर्वसामान्य माणसांना समजावे ह्या हेतूने भावार्थदीपिका ह्या नावाने भगवत गीतेवर निरूपण भाषांतर करून विश्वबंधुत्त्वाची प्रेरणा देणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ केला.ह्या ग्रंथामुळे केवळ भारतातच नाहीतर जगात भारतीय संस्कृती आणि संतवाड:मयाकडे लक्ष वेधले गेले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१ व्या वर्षी इ.स. १२९६ त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

#संतांचीचित्रवारी #KalaKariWarkari #fbdindi2021
#माझीआठवणीतीलवारी #FacebookDindi Art by Ajay Shinde

May be an illustration of text

Comments

Popular posts from this blog

शिवश्री

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

भागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव