संत तुकडोजी महाराज

!!राम कृष्ण हरी!!
संत ६
संत तुकडोजी महाराज

राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती.
ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका,अस्पृश्यता गाडून टाका,दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
विशेष म्हणजे चीन युद्ध १९६२ व पाकिस्तान युद्ध १९६५ झाले तेव्हा सैन्यास धीर देण्या साठी स्व:त सीमेवर जाउन महाराजांनी वीरगीतेचे गायन केले.

#संतांचीचित्रवारी
#माझीआठवणीतीलवारी
#facebookdindi #fbdindi2021 #KalaKariWarkari Sketch by @Ajay Vilas Shinde

May be an illustration

Comments

Popular posts from this blog

शिवश्री

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

भागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव