संत नामदेव

संत ४
संत नामदेव

संत शिरोमणी नामदेव महाराज ह्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० ला झाला. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता. नामदेवांच्या घरात त्यांच्या आजोबापासून विठ्ठलभक्तीचे वातावरण होते त्यामुळे त्यांना बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. महाराष्ट्रातील मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी ते वारकरी संतकवी होते.

भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते.त्यांनी उत्तर भारतात तब्बल ५४ वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. नामदेवांनी पंजाबमध्ये भक्तिमार्गाचा शुभारंभ केला. शिखांच्या गुरू ग्रंथ साहिबातले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. रामानंद, कबीर व नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली. गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे भावनिक एकात्मता प्रबोधन केले. राजस्थानातील जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवर अशा मोठ्या शहरातून नामदेवांची मंदिरं आहेत. तसेच त्यांच्या नावाच्या शाळाही आहेत.

संत नामदेवांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली आहेत.
संत नामदेवांचे अभंग गाथा, २५०० अभंग आहे. अशी प्रसिद्ध आहे त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना केलेली आहे. त्यामध्ये १२५ पदे आहेत. त्यातील ६२ अभंग नाम देवजीकी मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथसाहेब मध्ये गुरुमुखी लिपीत आहेत.

!!राम कृष्ण हरी!!

#संतांचीचित्रवारी
#माझीआठवणीतीलवारी
#FacebookDindi #FBDindi2021 #KalaKariWarkari Art by @Ajay Vilas Shinde

May be a cartoon of standing

Comments

Popular posts from this blog

शिवश्री

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

भागवत धर्माची पताका देशभरात अभिमानाने उंचावणारे संत नामदेव