नारायण महाराज देहूकर
प्रशांत महाराज मोरे देहूकर is feeling festive at श्री क्षेञ देहु.
🚩🚩
श्रावण शुदध चतुर्थी. पालखी सोहळा जनक तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर पुण्यतिथी🚩🚩
तपोनिधी नारायण महाराज देहूकर हे संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव. त्यांचा जन्म तुकोबांच्या सदेह वैकुंठगमना नंतर 3-4 महिन्यांनी मातोश्री जिजाबाई यांच्या पोटी झाला. अर्थातच नारायण महाराज यांना त्यांचे वडील तुकोबांचे प्रेम आणि सहवास लाभला नाही. तुकयाबंधु कान्होबाराय यांनी त्यांचा खूप प्रेमाने सांभाळ केला.
विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मुळपुरुष यांच्या आधीपासून तुकोबांच्या पुर्वजांमध्ये पंढरीच्या वारीची परंपरा अखंड चालू होती, हे महिपती लिखीत तुकोबांच्या चरित्रात निदर्शनास येते. विश्वंभर बाबांच्या आई त्यांना म्हणतात
तुझ्या वडिलो वडिली l
निर्धारी चालविली पंढरीची वारी ll
*त्याशी सर्वथा अंतर न करी l*
*तरीच संसारी सुफळपण ll*
याच विश्वंभर बाबांनी सर्वात प्रथम एकत्रीत विठ्ठल रखुमाई या स्वयंभू मूर्तीची स्थापना आपल्या वाड्यात केली. त्यांच्या पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालू ठेवली.
पंढरीची वारी आहे माझे घरी I
आणिक न करी तीर्थव्रत॥
तुकोबांच्या सदेह वैकुंठगमना नंतर कान्होबारायांनी आणि तुकोबांचे पुत्र महादेवबुवा- विठ्ठलबुवा यांनी हा पंढरीला जाणारा दिंडी सोहळा अखंडपणे चालू ठेवला. परंतू वृद्धापकाळामुळे तुकयाबंधु कान्होबारायांनी या वारीची धुरा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराजांकडे दिली. तेही काही वारकऱ्यां समवेत पंढरीची वारी करू लागले. काही वर्षांनंतर त्यांना मनोमन वाटु लागले की या वारीत आपल्या बरोबर भागवत धर्माचे कळस तुकोबा आणि भागवत धर्माचे पाया ठरलेले ज्ञानोबा माऊली असतील तर पंढरीची वारी अधिक परिपूर्ण आणि भक्तीरसपूर्ण होईल. हे श्वास आणि उच्छवास बरोबर असतील तर या जीवनाचे सार्थक होईल. या अनुषंगाने नारायण महाराजांनी इ.स.१६८५ साली जेष्ठ वद्य सप्तमी या दिवशी पालखी सोहळा चालू केला. देहूत संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन ते आळंदीला जात. तेथे माउलींच्या पादुका पालखीत विराजमान करीत. अशा प्रकारे एकाच पालखीत जगद्गुरू तुकोबा आणि माउली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन हा पालखी सोहळा पंढरपूरला मार्गस्थ होत. नारायण महाराज सोहळ्यात कीर्तन भजन करून भक्तीमय वातावरण तयार करीत.
*ज्ञानोबा- तुकाराम* हा आज वारकरी सांप्रादायात चालू असलेला भाव भक्तीचा गजर नारायण महाराजांनीच चालू केला.
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या १६८० मध्ये झालेल्या निधनानंतर औरंगजेब आपले काही लाख मुघल सैनिक घेऊन महाराष्ट्रात पाय रोऊन बसला होता. त्याने येथे त्रास देऊन उच्छादाच्या परिसीमा पार केल्या होत्या. अशा काळात नारायण महाराजांनी पालखी सोहळा चालू करून वारकरी
सांप्रादयात मोठे धाडसाचे पाऊल उचलले होते. छत्रपती संभाजी महाराज हे नेहमी देहूला दर्शनाला येत. त्यामुळे त्यांचे नारायण महाराजांशी जिव्हाळ्याचे नाते होते. छ्त्रपती संभाजी महाराजांनी या पालखी सोहळ्यास मुघलांचा काही उपद्रव होऊ नये म्हणून संरक्षण प्रदान केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या १६८९ च्या बलीदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी हे संरक्षण पुढे चालू ठेवले होते.
या रे या रे लहान थोर
याति भलते नारीनर॥
अशा प्रकारे सकल वारकरी सांप्रादयाला ,सर्व जाती पातीला, लहान थोरांना आणि स्त्री- पुरुषांना हवा हवासा वाटणारा भक्तीचा परमोच्च आनंद देणारा पालखी सोहळा नारायण महाराजांनी चालू करून अखिल जगतामध्ये इतिहास घडवला. वारकरी सांप्रादयातील शेवटचे संत पिंपळनेरचे संत निळोबाराय यांनाही नारायण महाराजांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले. थोडयाच कालावधी मध्ये त्यांच्या योगदानामुळे ते वारकरी सांप्रादयातील सकल वैष्णवांना जीव की प्राण वाटू लागले.
॥सकल वैष्णवा वाटे जीव प्राण | तो नारायण देहूकर ॥
अशा परम पवित्र , संत तपोनिधी उपाधी पात्र, तुकोबा पुत्र नारायण महाराज देहूकर या थोर विभूतीस नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन👏🏻💐
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ॥
🚩राम कृष्ण हरी🚩
Shrirang Gaikwad is feeling blessed with प्रशांत महाराज मोरे देहूकर and 4 others.
ही साथ सर्वत्र पसरो...
।।ज्ञानबातुकाराम।।चा 'बा तुकोबा' विशेषांक घेऊन देहूला गेलो. श्री विठ्ठल-रुखमाई आणि तुकोबारायांच्या चरणांवर अंक ठेवला. भरून पावलो!
तृप्त समाधानाचा ढेकर खरं तर अगोदरच आला होता.
शहराळलेल्या आमच्या मानसिकतेला देहूकरांनी सुखद धक्का दिला होता. केवढं जिव्हाळाभरल्या मनानं स्वागत केलं प्रत्येकानं!
छोट्या अपघातात पायाला दुखापत झाली म्हणून अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला येऊ न शकलेले देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्याकडं पहिल्यांदा गेलो.
जिना चढतानाच स्वागत केलं, ते सुंदर 'अभंग रांगोळी'नं! दररोज दाराशी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग रांगोळीनं रेखाटायचा.. केवढी सुंदर कल्पना!
नितीन महाराजांच्या सूनबाई भक्तिभावानं रोज हे काम करतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवर ही रांगोळी शेकडोजण फॉलो करतात.
नितीन महाराजांच्या इटुकल्या नातवासह सर्वजण गप्पांमध्ये सहभागी झाले. तुकोबारायांवर लिखाण करणाऱ्या सर्व लेखकांचा देहूत सत्कार करण्याचा मानस नितीन महाराजांनी बोलून दाखवला.
तिथंच प्रशांत महाराज मोरे घ्यायला आले. ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. संभाजी महाराज देहूकर त्यांचे वडील. संभाजी महाराजांच्याही पायाचं ऑपरेशन झाल्यानं बेडवर बसूनच त्यांनी गप्पा मारल्या. अभंग गायला. तुकोबारायांवर 'आकाशाएवढा' नावाची कादंबरी ते लिहितायत. पारंपारिक कीर्तनकार, वारकऱ्यानं वयाच्या ७२व्या वर्षी अशा प्रकारचं लिखाण करावं, याचं कुणालाही विशेष वाटेल.
सगळं कुटुंब आमच्या भोवती जमलं. संभाजी महाराजांची गोड नातवंडं भोवती घुटमळत होती. एखादा तुकारामांचा अभंग येतो का, विचारताच दोघांनी आढेवेढे न घेता एकसुरात सुंदर अभंग गायला.
दोन्हीही घरचा जेवणाचा आग्रह नम्रपणे नाकारून ज्यांच्या छायाचित्रांनी 'बा तुकोबा' सजलाय, त्या फेसबुक दिंडीच्या स्वप्निल मोरेंकडं गेलो. स्वप्निलनं गरमागरम पॅटिस समोर ठेवली. मग खाण्यावाचून पर्याय नव्हता. तेवढ्यात त्यांचे आईवडील आले. दोघेही शेतावरून आलेले. मागोमाग भाऊ, बहिणी आल्या. स्वप्निलच्या कडेवर छोटी वारी होतीच. या सगळ्या कुटुंबाकडं 'बा तुकोबा' सोपवला. स्वप्निलच्या वडिलांनी देहूची वेस ते तुकोबारायांवरील नाणं असे अनेक किस्से ऐकवले.
'बा तुकोबा'साठी देहूतील अशोक कंद यांनी सुंदर पेंटिंग दिलं आहे. तेही तिथंच भेटले.
तिथून निघालो तो थेट मंदिरात पोहोचलो. श्रीविठ्ठल रुखमाईच्या, तुकोबा, बहिणाबाईंच्या चरणी अंक ठेवला.. याजसाठी केला होता अट्टाहास..!
संस्थान आणि समोरच्या दुकांनामध्ये अंक दिले न् निघालो.
सुरुवातीपासून आमच्यासोबत थांबलेल्या टीव्ही पत्रकार स्वाती गोडसेनं आपला हट्ट सोडला नाही. घरी तिचे आईवडील आमची वाट पाहत होते. गेलो.
त्यांचा प्रेमाचा पाहुणचार घेणं अपरिहार्यच होतं. सामाजिक उपक्रमांत उत्साहानं सहभागी होणाऱ्या स्वातीची उर्जा म्हणजे तिचे आईवडील.
त्यांचा निरोप घेऊन निघालो तेंव्हा जाणवलं की, एका वेगळ्याच देहूचं दर्शन आम्हाला झालंय.
या देहूत मनापासून आदरातिथ्य करणाऱ्या, आपुलकीनं वागणाऱ्या, निरपेक्ष प्रेम देणाऱ्या, कौटुंबिक जिव्हाळा जपणाऱ्या आणि तुकोबारायांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या माणसांचं गोकुळ नांदतं आहे.
एक निर्व्याज प्रेम-जिव्हाळ्याची साथच तिथं मुक्काम ठोकून आहे जणू.
देहूतील ही प्रेम-जिव्हाळ्याची साथ सर्वत्र पसरो हीच तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना...
#ज्ञानबातुकाराम
बा तुकोबा
(संत तुकाराम महाराज विशेषांक)
संतांनी मानवतेच्या विचारांचं मंदिर उभारलं. त्याचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला, तर त्यावर कळस चढवला, संत तुकाराम महाराजांनी!
या वारकरी परंपरेला आणि एकूणच माणुसकी जपणाऱ्या विचार परंपरेला उजाळा देण्यासाठी
।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाची सुरुवात करण्यात आली आहे. याचे संपादक आहेत, पत्रकार आणि संत साहित्याचे अभ्यासक
डॉ. श्रीरंग गायकवाड.
आपल्या अभंग कवितेनं जगाला मार्ग दाखविणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांचं स्मरण करण्यासाठी या वार्षिकाचा
बा तुकोबा हा वार्षिक अंक
१ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.
तुकोबारायांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
डॉ. सदानंद मोरे यांनी या विशेषांकाचं प्रकाशन केलं. तुकोबांची तपोभूमी भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी 'ज्ञानबातुकाराम'च्या गजरात हा प्रकाशन सोहळा रंगला.
अंकाची वैशिष्ट्ये :
- 'ज्ञानबातुकाराम' ही संत विचार संकल्पना काय आहे, याबद्दल
डॉ. सदानंद मोरे यांचा सविस्तर लेख
- विभाग १ : रिपोर्ताज - तुकाराम महाराजांच्या पाऊल खुणांचा शोध
- विभाग २ : तत्त्ववेत्ते तुकोबा - आपल्या अभंगांतून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारे संत तुकाराम महाराज
- विभाग ३ : संस्कृतीपुरुष - आपली संस्कृती घडविणारे संत तुकाराम महाराज
- सुंदर, बोलकं एम्बोसिंग, गोल्डन फॉईलिंग केलेलं मुखपृष्ठ
- संपूर्ण आर्ट पेपरवर रंगीत छपाई
- अप्रतिम छायाचित्रे असलेला,
१३६ पानांचा भरगच्च आणि दर्जेदार मजकूर असलेला संग्राह्य अंक
- किंमत : १५० रुपये
- अंकासाठी संपर्क - 9833661443
Shrirang Gaikwad नरेंद्र बाळासाहेब साठे
आग्रहाचं निमंत्रण...
उद्या नववर्षाच्या मुहूर्तावर आम्ही संत साहित्याला वाहिलेलं नवं वार्षिक सुरू करत आहोत.
त्याचं नाव आहे : ।।ज्ञानबातुकाराम।।
पहिला विशेषांक आहे : संत तुकाराम महाराज यांच्यावर.
त्याचं नाव आहे : 'बा तुकोबा!'
प्रकाशन ठिकाण आहे : भामचंद्र डोंगर पायथा, चाकण
प्रकाशन दिनांक : १ जानेवारी २०२२
प्रकाशन हस्ते : डॉ. सदानंद मोरे
वेळ : सकाळी ९.३०
आपण यावं, ही नम्र विनंती!🙏

















Comments
Post a Comment